About Us

About Us

आवळा हा समस्त भारतभर असणारा एक विशेष वृक्ष आहे. अति प्राचीन किंवा वेदकालापासून आवळ्याचा वापर रोजच्या व्यवहारात; तसेच औषधीकरणासाठी खूप मोठय़ा प्रमाणात होत आहे. आवळा आमलक, तृष्यफला, धात्री, वयस्था अशा विविध संस्कृत नावांनी ओळखला जातो. आवळ्याचे आपल्या सर्वाच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान या विविध नावांनीच स्पष्ट होते. 


‘आमलक म्हणजे शरीरात कोणताही घातक मल साठू नये; शरीर सतत निर्मळ राहावे असा अर्थ आहे. 


‘तृष्यफला म्हणजे आवळा वेगवेगळ्या स्वरूपात सेवन केला असता सेवन करणाऱ्याला तृप्तीचा आनंद लगेचच मिळतो. 


‘धात्री म्हणजे आपली प्रेमळ आई जशी आपल्या मुलाबाळांची काळजी घेते; तसेच कार्य आवळ्याच्या वापराने सर्वाकरिताच होत असते. 


‘वयस्था म्हणजे तुम्हा-आम्हाला दीर्घकाळचे निरोगी आयुष्य देण्याकरिता श्री ब्रह्मदेवाने या पृथ्वीवर आवळा वृक्षाची योजना खासकरून केलेली आहे.

 

आवळ्याला सुपरफूड म्हणतात. हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेलाही अनेक फायदे देते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना (White Blood Cells) बूस्ट करण्याचे कार्य करते. म्हातारपणातील प्रमुख लक्षण म्हणजे त्वचेवरील वाढत्या सुरकुत्या, आवळ्याच्या वापराने कमी होतात. आवळ्याच्या विविध वापरामुळे शरीरातील फाजील चरबी न वाढवता; अस्थि, मज्जा, शुक्र व ओज यांची आरोग्यदायक वाढ होते. 

आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. 

1.     आवळ्यामुळे मधुमेह (Diabetes) नियंत्रणात राहण्यास मदत होते.


2.     आवळा ज्यूस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो.


3.     आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते.


4.     आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहेत. जे आपले पोट स्वच्छ करण्याचे कार्य करतात. आवळा खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते त्यामुळे मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते.


5.     आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते. 


6.     आवळा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते.


7.     लघवीचा ज्यांना त्रास आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले.  ज्यूस प्यायल्याने लघवीसंबंधीचे आजार दूर होतात.


8.     आवळा सरबत घेतल्याने सतत तोंड येत असेल तर ही समस्या दूर होते. तसेच डोळ्यांची शक्ती वाढण्यास मदत होते.

आमची उत्पादने

आवळा कॅंडी                

आवळा बीटरूट कॅंडी               

आवळा मसाला कॅंडी                 

आवळा ज्युस

आवळा स्कॉश              

आवळा लोणचे                          

आवळा छुन्दा                            

आवळा चटणी 

आवळा वडी                 

आवळा पावडर

Search here